अजित पवार यांचे हात बळकटीसाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलने कामाला लागावे

ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांचे आवाहन
राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संख्येने ५२ टक्के असलेला ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेसोबत प्रदेशाध्यक्ष, खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने आणण्यासाठी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अठरापगड जाती, धर्म व बलुतेदार आदी ओबीसी घटकांना सोबत घेऊन ओबीसी हीतासाठी काम करत आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने सुरू असलेल्या अजितपर्व पदाधिकारी संपर्क अभियानांतर्गत कणकवली शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. आखाडे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे, मनोहर साटम, तालुकाध्यक्ष उदय भोसले, राजेंद्र पावसकर, संदीप पेडणेकर, सत्यवान गवस, नाथा मालंडकर, आर. के. सावंत, वैभव रावराणे, रशिद खान, महिला तालुकाध्यक्षा सौ. रिद्धी परब, पुजा पेडणेकर, कणकवली शहराध्यक्ष इम्रान शेख, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सतीश पाताडे, विराज बांदेकर, निशीकांत कडुलकर, केदार खोत, राजू वर्दम, गोपाळ तेली, प्रथमेश माने, राजू दळवी, श्रीराम डिगसकर, चंद्रकांत मांजरेकर दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, मेघेंद्र देसाई व इतर उपस्थित होते.
यावेळी श्री. आखाडे ओबीसी सेल जिल्हा कार्यकारणीचा संघटनात्मक आढावा घेऊन मजबूत संघटना बांधणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढविण्यासाठी ओबीसीतील विविध जात घटकांना पक्षाच्या प्रवाहात आणावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना अबिद नाईक म्हणाले, ओबीसी सेल जिल्हयात वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी संघटना वाढविताना ओबीसी सेलच्या माध्यमातून ओबीसींसाठीच्या योजना त्या-त्या भागात पोहोचविण्याचे काम जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच संघटना वाढीसाठी लागणारा विकास निधी हा वरिष्ठ स्तरावरून आपल्या सूचनेनुसार सिंधुदुर्गमध्ये देण्यासाठी आखाडे यांनाही विनंती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सावळाराम अणावकर यांनी केले.