माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्यावतीने कुंभवडे येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने युवासेना पुरस्कृत व युवाप्रतिष्ठान कुंभवडे यांच्या वतीने भव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि 22 व 23 मार्च या दोन दिवसात क्रिकेट चा महासंग्राम कुंभवडे गावामध्ये रंगणार आहे.या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी विधानसभा प्रमुख सतिश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. प्रथमता दीपप्रज्वलन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा युवा प्रतिष्ठान कुंभवडे च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कुंभवडे गावच्या प्रथम नागरिक विजया कानडे, माजी सरपंच सूर्यकांत तावडे, संजय सावंत, प्रदीप सुतार,पांडुरंग सावंत,संजय सावंत,युवासेना तालुका समन्व्यक गुरु पेडणेकर, चेतन गुरव, समीर सावंत आदी खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते