कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तीमत्त्व पुरस्कार मा.ऍड शंकर राणे यांना प्रदान

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कै.दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण यांच्या स्मरणार्थ शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल यांच्या वतीने गेली १७वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवर अशा एका व्यक्तीला आदर्श व्यक्तीमत्त्व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यावर्षी ॲड. शंकर राणे या हा पुरस्कार माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल यांच्या वतीने गेली ३५ वर्षे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने सत्यनारायनाची महापूजा, हरिपाठ, दशावतारी नाटक असे कार्यक्रम करण्यात आले.यावेळी ऍड शंकर राणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.मा.आ.वैभव नाईक , युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी ही भेट दिली
यावेळी कट्टर शिवसैनिक राजू शेट्ये, भालचंद्र दळवी,माजी सभापती मधुकर सावंत,मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उपतालुकाप्रमुख राजू राणे, सौ राखी राणे,अध्यक्ष रोहित राणे,मा.सरपंच स्मिता परब,अनंत राणे,सुभाष परब,विजय परब,आप्पा ठाकूर,सुभाष राणे,तृप्ती पालकर,गणेश राणे,विकास गुरव,महेश कदम,सुधाकर राणे,व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!