जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या मुलींची यश.

कणकवली/मयूर ठाकूर

बांदा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुलींनी नेत्रदीपक यश संपादन करत जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
प्रचंड सरावाने हे यश मुलींनी प्राप्त केले आहे,
शर्वरी सावंत हिच्या नेतृत्वाखाली दृष्टी पाताडे,तेजस्विनी बांदल, स्नेहा मल्हारी, समीक्षा चव्हाण, लिशा जाधव, पूर्वा तेली, दिशा बिडये,जिया आंबेरकर,क्रीशला तोरसकर,अनुष्का दळवी या मुलींचा या संघात सहभाग होता
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!