संतोष नामदेव केसरे या सांगलीतील रेड गावातून कुडाळमध्ये भरकटलेल्या युवकाचे संविता आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन

मानसिक आजारी अस्थेत भरकटला होता युवक

गुगल सर्च आधारे संविता आश्रमच्या टिमने शोधले संतोष केसरे याचे गाव.

सविता आश्रम,पणदूर 11 मार्च:- सांगली जिल्ह्यातील मुक्काम रेड , तालुका शिरोळा येथील संतोष नामदेव केसरे हा युवक मानसिक आजारी अवस्थेत 1 फेब्रुवारी 2025 पासून त्याच्या राहत्या घरापासून भरकटला होता. कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीसांना संतोष हा झाराप जांभळ स्टॉप जवळ निराधार स्थितीत रस्त्या कडेला बसलेला दिसून आला. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांच्याशी पोलीस अधिकारीनी संपर्क करून संतोष यास सुरक्षितता आणि देखभालीसाठी दिनांक 6 मार्च 2025 रोजी संविता आश्रमात दाखल केले.

   संविता आश्रम कडून युवकावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर धुरी यांच्याकडे मानसोपचार करण्यात आले. डॉक्टरांचे मानसोपचार आणि आश्रम च्या सेवा सुश्रुशेने संतोष लवकरच बरा झाला.

   संतोष हा खूपच हळू आवाजात बोलत असल्याने त्याचे बोलने समजत नव्हते. मात्र त्याने कागदावर लिहून दाखवलेल्या त्याच्या रेड या गावाच्या नावा आधारे जीवन आनंद संस्थेचे  विश्वस्त किसन चौरे आणि आश्रमच्या टीमने गूगल आधारे ता.शिरोळा जि.सांगलीतील रेड गावाचा शोध घेतला. गावचे ग्रामसेवक प्रमोद माळी आणि पोलीस पाटील उज्वला  यांचा गुगलवरून संपर्क नंबर मिळविण्यात आला. पोलीस पाटील उज्वला यांनी तात्काळ संतोष च्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संतोषचा व्हिडिओ कॉल द्वारे संवाद होण्यासाठी महत्त्वाचे सहाय्य केले. 

  संतोषचे भाचे प्रकाश शिंदे आणि वडील नामदेव केसरे यांनी नुकतेच संविता आश्रमात येऊन संतोष यास घरी नेले. मानसिक आजारी अवस्थेत निराधार व बेघर झालेल्या युवकास लवकरच त्याचे कुटुंब मिळाल्याने संतोषच्या कुटुंबीयांनी आणि संविता आश्रमच्या टीमने आनंद व्यक्त केला. 
   कुटुंब पुनर्मिलन प्रसंगी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब , संस्थेचे विश्वस्त जितेंद्र परब, स्नेही मित्र शैलेन्द्र कदम, विजया कांबळी, प्रविण शिंगडा यांचेसह संतोषचे नातलग सागर पवार, रोहिदास कुंभार यांची यावेळी उपस्थिती होती.
error: Content is protected !!