जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या मुलींची बाजी.

कणकवली/मयूर ठाकूर

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेच्या 14 वर्षाखालील वयोगटातील मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
आर्या मालंडकर हिच्या नेतृत्वाखाली अंजली गुप्ता,गिरीजा मोहिते, काव्या पेडणेकर,खुशबू गुप्ता, निधी घाडीगावकर,प्राप्ती अक्कतंगेरहाळ, मृण्मयी केरकर, लावण्या देसाई, शामली बागवे, रक्षिता गावकर, श्रावणी आमडोसकर,शिशु जेना, सोनम अरकराव अशा मुलींच्या संघाने खेळाचे अप्रतिम प्रदर्शन करत प्रशाले साठी विजयश्री खेचून आणली. यासाठी त्यांना प्रशाला क्रीडाशिक्षक योगेश सामंत सर व श्री वासुदेव दळवी सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!