कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड

कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव ,सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची निवड
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव, सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळा ची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च रोजी मराठा मंडळ सभागृह कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणीची पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण म्हणाले की, समाज संघटनेच्या माध्यमातून समाजबांधवांच्या हिताला कायम प्राधान्य दिले जाईल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना समाजातील सर्व घटकांची एकजूट महत्वाची असते. सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे आदर्शवत काम नूतन कार्यकारीणीच्या माध्यमातून करणार आहोत. नूतन कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. माजी तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण,माजी सचिव अविनाश चव्हाण यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण, मयुरी चव्हाण, सुंदर जाधव, सुभाष जाधव, माजी तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, प्रकाश वाघेरकर, शंकर, जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी सचिव अविनाश चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण,माजी खजिनदार संजय चव्हाण, आनंद जाधव तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.