पदर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नीलम राणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा झाला शुभारंभ

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे विशेष सहकार्य

पदर महिला प्रतिष्ठान तर्फे 7 आणि 8 मार्च रोजी दोन दिवस जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या . पाक कलेसाठी पारंपारिक पदार्थ आणि पारंपारिक वेशभूषा अशी थीम देण्यात आली होती. यामध्ये जवळपास 40 स्पर्धक सहभागी झाले होते. पाककलेमध्ये प्रथम क्रमांक विना मालंडकर-शिरवाळे रस, द्वितीय क्रमांक गवल्याची खीर, तृतीय क्रमांक सायली महाडिक – मासवडी रस्सा, तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिताली माणगावकर -भतकम् पुरणपोळी, द्वितीय क्रमांक सात कप्प्याचे घावन, तृतीय क्रमांक फणसाच्या कुयरीची कापे या स्पर्धेसाठी शेफ अमित टकले, हर्ष कॅफे आणि वसुधा माने परीक्षक म्हणून लाभले होते.
नंतर संगीत खुर्ची, रस्सीखेच, दोरी उड्या, बॉल बकेट मध्ये टाकणे, गाण्यांवरून वस्तू ओळखणे, बिस्किटे खाणे अशा वेगवेगळ्या फनी गेम्स मधून महिलांनी भरघोस बक्षीस आणि आनंद लुटला.
8 मार्च रोजी नीलम राणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्वेता कोरगावकर, प्रज्ञा ढवण , प्राची कर्पे,सुप्रिया नलावडे, दीपलक्ष्मी पडते, कविता राणे, मेघा सावंत इत्यादी उपस्थित होत्या. नीलम राणे यांच्या हस्ते कणकवली शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले. कणकवली तालुक्यातील महिला डॉक्टर ज्यानी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत क्रिकेट क्षेत्रामध्ये विशेष यश संपादन केलेले आहे अशा डॉक्टर प्रीती पावसकर, डॉक्टर हेमा तायशेटे, डॉक्टर मीनल आपटे, डॉक्टर वंदना काणसे, डॉक्टर कविता डेगवेकर, डॉक्टर नयना शेट्टी, डॉक्टर अर्पिता आचरेकर, डॉक्टर दिपाली चराटे यांचा पदक आणि झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. संयोगिनी सेवा महिला मंडळ यांच्या दिपाली सरूडकर आणि त्यांचे सर्व सदस्य महिला यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
संगीत क्षेत्रातील विशारद ही पदवी प्राप्त केलेल्या तेजस्विता पेंढुरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कौसल्येचा राम आणि हीच आमची प्रार्थना या मानवतेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर हरकुळ बुद्रुक च्या विनंती खोचरे आणि महिलांनी नाटिका सादर केली. .
राजश्री रावराणे(नर्गिस-पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में) साक्षी वाळके-ईरा वाळके( हेलन- उई मा उई मा ये क्या हो गया),गार्गी कामत-वेदा कामत( वैजयंती माला-मैं क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया), सुनेजा साटम(लीना चंदावलकर-ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है) दिपाली पवार( हेमा मालिनी -जब तक है जा जाने जहा मै नाचूंगी),मयुरी वडखलकर(जयाप्रदा – बरसात में जब आयेगा सावन का महीना), सोनल साळगावकर( आशा पारेख -सायोनारा..सायोनारा..), सानिका परब ऋचा परब (श्रीदेवी – नैनो मे सपना सपनो मे सजना), दिशा राणे (परविन बॉबी- प्यार करने वाले प्यार करते है शान से), स्मिता जोगळे (डिंपल-दिल घूम घुम करे)यांनी दिलखेचक मिसेस साजसखी हा फॅशन शो सादर केला
प्रणाली चव्हाण, संजना सदडेकर पूजा माणगावकर साक्षी तर्फे साक्षी वाळके ,मयुरी वडखलकर साक्षी आळवे ,सुषमा पोटफोडे यांनी रेट्रो डान्स सादर केला.
भारती पाटील साक्षी वाळके पूजा माणगावकर, संजना सदडेकर,साक्षी तर्फे ,सुषमा पोटफोडे यांनी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा याबालगीतांवर नृत्य केले.
आसावरी गांगण, स्वानंदी कोदे , प्रांजल काळसेकर, याज्ञवी कोदे, प्रणाली चव्हाण ,प्रियाली कोदे, मेघा गांगण यांनी हिरामण्डी च्या गाण्यां वर मुजरा सादर केला. मानसी गोसावी यांच्या एस के ग्रुपने नृत्य सादर केले. मेघा सावंत, साक्षी आळवे, सुषमा पोटफोडे , संजना आळवेआणि ग्रुप यांनी विठ्ठलाच्या गाण्यावर नृत्य केले.‌ नम्रता तेजमने घूमर सादर केला. महेक चव्हाण आणि तिच्या मैत्रिणींनी डान्स परफॉर्मन्स सादर केला. दिपाली सरूडकर यांनी आपले नृत्य सादर केले. स्वानंदी- याज्ञवी कोदे तसेच ईरा वाळके यांनी आपला डान्स परफॉर्मन्स केला. मनीषा मयेकर, मेघा राणे आणि मानसी सुतार यांनी कराओके वर गाणे सादर केली.
संपदा पारकर ओमश्री दळवी, ओवी सुतार, खुशी राणे योगिता बाईत सानिका बाईत ममता राणे, सरिता पाटील,गोसावी अक्षता खंबाळकर आणि ग्रुप अशा अनेक जणांनी आपापले परफॉर्मन्स पदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सादर केले.
या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका आणि दिग्दर्शन प्रियाली कोदे यांनी केलं. यावेळी प्रगत प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष हर्षदा गव्हाणकर सुप्रिया नलावडे प्राची करपे क्रांती लाड आरती राणे विनिता राणे विना राणे पुष्पा वाळके संध्या पोरे भारती पाटील मनवा शेटे स्मिता कामत राजश्री परब, कविता राणे अंकिता करपे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा पारकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेघा गांगण यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!