कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न, प्रणिता राऊळ प्रथम

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. परीक्षकांचे निर्णयानुसार स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..
प्रथम = श्रीम. प्रणिता राऊळ, वेंगुर्ला. द्वितीय = श्रीम. पूर्वा खाडिलकर, सावंतवाडी. तृतीय = श्री .संग्राम कासले, मालवण तर उत्तेजनार्थ श्री. रणजीत पाटील, देवगड व श्री. प्रसाद खडपकर, कुडाळ.
विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम रु. 2000, द्वितीय रु. 1500, तृतीय रु.1000 अशा रोख स्वरूपाच्या रक्कमांसहित सन्मान चिन्हे पारितोषिक म्हणून देण्यात आली. उत्तेजनार्थ क्रमांकांना सन्मानचिन्हे देऊन तर सहभाग उत्तेजनार्थ म्हणुन सर्वश्री श्रीम. सायली म्हाडगुत, श्रीम. दिव्या परब, श्रीम. आशा मोहिते व श्री. सुजय जाधव यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. सुरेश शामराव ठाकूर, (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण) हे होते, वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्री. संजय शिंदे, (ग्रंथपाल नगर वाचन मंदिर मालवण ) यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. गुरुनाथ ताम्हणकर सर (पदवीधर शिक्षक मसुरे ) व श्री.संजय शिंदे मालवण यांनी काम पाहिले. उद्धाटन सोहळ्याचे प्रास्ताविक श्री. सुरेंद्र सिताराम सकपाळ अध्यक्ष कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक यांनी केले. प्रास्ताविकामध्ये बोलतांना स्पर्धेची रूपरेषा आणि स्पर्धेचे नियम उपस्थित स्पर्धकांना समजावून सांगितले.
पारितोषिक वितरण सोहळा श्री. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, त्यांनी स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या या वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन आणि नियोजन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मार्गदर्शक असे झाले. कार्यक्रमासाठी श्री. अमेय लेले, ग्रंथपाल, श्री. बंडू जाधव, सहाय्यक ग्रंथपाल व श्रीम. चैताली सुतार यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एकनाथ गायकवाड सर यांनी केले.

error: Content is protected !!