अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे जिल्हा अध्यक्ष बुवा योगेश पांचाळ यांचा सन्मान.

कणकवली विशेष कार्यकारी अधिकारी श्री.प्रवीण ठाकूर यांसकडून सत्कार.

कणकवली/प्रतिनिधी

अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळ जिल्हा सिंधुदुर्ग यांची कार्यकारिणी नुकतीच निर्माण झाली असून या कार्यकारिणीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून विशेष कौतुक होताना दिसत आहे.या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यान्वित असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या संस्थेचा वेल विस्तार वाढत आहे.भजन सांप्रदायाची पंढरी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही संस्था विशेष कार्य करीत असून या संस्थेच्या जिल्हा अध्यक्षपदी श्री.योगेश पांचाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.भविष्यामध्ये या संस्थेच्या मार्फत विविध सामाजिक योजनांचा लाभ भजनी बुवा तसेच सर्व भजनी कलाकारांना मिळावा अशी आशा व्यक्त करत हा सन्मान प्रवीण ठाकूर यांनी केला.मला मिळालेले हे पद मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी बुवांच्या हितासाठी व त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी करेन तसेच त्यांच्या रोजी-रोटी साठी आवश्यक अशी उपाययोजना करेन असे आश्वासन यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष योगेश पांचाळ यांनी दिले.तसेच सन्माननीय संजयजी गावडे यांच्या माध्यमातून ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात मजबूत करण्याची ग्वाही यावेळी योगेश पांचाळ यांनी दिली.यावेळी महापुरुष प्रसादिक भजन मंडळ आशीये.तालुका कणकवली या संस्थेचे अध्यक्ष उमेश ठाकूर उपस्थित होते.तसेच चिंतामणी पांचाळ बुवा स्मारक बांधकाम समितीचे सह खजिनदार तुकाराम मेस्त्री उर्फ संदीप मेस्त्री आणि महापुरुष प्रसादिक भजन मंडळ आशिये या संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश ठाकूर.उपाध्यक्ष संतोष ठाकूर.सहसचिव कैलास नेबळेकर,मंदार ठाकूर,गौरव ठाकूर,मंथन ठाकूर,शुभम ठाकूर,आर्यन ठाकूर,निषाद ठाकूर,संकेत ठाकूर,मुकेश ठाकूर, मिलिंद गवाणकर,दत्तप्रसाद गवाणकर, सचिन ठाकूर,विनोद ठाकूर,अविराज मराठे,हर्ष म्हस्कर प्रसाद म्हस्कर,चेतन गवाणकर,शेखर ठाकूर,लक्ष्मण ठाकूर,ऋषी ठाकूर, आशिष ठाकूर,शेखर ठाकूर, सदानंद ठाकूर,महादेव ठाकूर, सुरज गवाणकर, या सर्व प्रवीण ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!