भारत-न्यूझीलंड उद्याच्या सामन्याचे कणकवलीत लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार

हिंदू रक्षक सेना, चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने आयोजन
उद्या होणारा भारत न्यूझीलंड क्रिकेट च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीन द्वारे हिंदू रक्षक सेना चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दाखवले जाणार आहे. दुपारी दीड वाजल्यापासून हे प्रक्षेपण सुरू केले जाणार आहे. भारत न्यूझीलंड क्रिकेट च्या अंतिम सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हिंदू रक्षक सेना चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने यासाठी हा लाईव्ह क्रिकेट सामना जनतेला एका वेगळ्या ढंगात पाहता यावा याकरता स्क्रीन द्वारे लाईव्ह सामन्याचे प्रक्षेपण ठेवण्यात आले आहे. या लाईव्ह प्रक्षेपण पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन या युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.