जागतिक महिलादिना निमित्त कणकवली येथे रक्तदान शिबीर आयोजन

50 रक्तदात्यांनी केले रक्तदान

        कणकवली नगरपंचायत DJSY-S अंतर्गत कनकसिंधू शहर संघ कणकवली, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, IIFL फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली नगरपंचायत हॉल येथे करण्यात आले होते.
       या कार्यक्रमाचे उदघाटन  गुरुकृपा हॉस्पिटलच्या डॉ. शमिता बिरमोळे  यांच्या वतीने स्वतः रक्तदान करून तसेच दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या श्रीम. तिवरेकर, श्री. बुचडे, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष प्रिया सरूडकर, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे कणकवली तालुकाध्यक्ष श्री मकरंद सावंत, नेहमीत रक्तदाते दादा कोरडे,  IIFL फायनान्सचे कोल्हापूर, कोकण टेरीटेरी मॅनेजर श्री प्रशांत आमणे, नगरपंचायतच्या ध्वजा उचले, रुचिता ताम्हणकर सर्व संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी महिला बचत गट सदस्य, जिल्हा रक्तपेढी चे डॉक्टर व कर्मचारी व महिला व पुरुष रक्तदाते मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी रक्तदाते व आयोजक यांना शुभेच्छा दिल्या 
         यावेळी 50 रक्तदाते यांनी रक्तदान केले यात 20 महिला व 30 पुरुष रक्तदाते होते. तर 15 रक्तदाते तांत्रिक कारणामुळे रक्तदान करू शकले नाही.
        या रक्तदान शिबिरात श्री व सौ आशा मनोज कोकरे, श्री व सौ अमृता मंदार मराठे, श्री व सौ कावेरी निखिल कासरलकर या तीन दांपत्यानी, हर्ष व सतीश कांबळे  या मुलगा व वडिलांनी तर तेजस व पूजा माणगावकर या मुलगा व आई यांनी एकत्र रक्तदान केले.
      शिबिर यशस्वी होण्यासाठी कनकसिंधू  स्तर संघाच्या व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे कणकवली कार्यकारिणी सदस्य सुशील परब, सौ. सुहासिनी कुलकर्णी, दुर्गाप्रसाद काजरेकर, विनायक पारधीये, देवेन सावंत, मंदार राणे, यशवंत महाडिक, शुभांगी उबाळे,दिव्या साळगावकर, रंजिता परब, स्वाती गोखले, सिध्दी नलावडे, अनुजा गावडे,ज्योती रावराणे,निलम कोरगावकर, मयुरी सरंगले, स्वाती राणे, सुचिता पालव, इशा कांबळे, विशाखा कांबळे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
       कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल भोगले, सूत्रसंचालन सुशील परब यांनी  तर आभार शुभांगी उबाळे यांनी मानले.
error: Content is protected !!