रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना 5000 सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप.

महिला दिनानिमित्त स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीचा उपक्रम

कणकवली/मयूर ठाकूर

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना 5000 सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले ,सदर कार्यक्रमाची सुरुवात आज कनेडी हायस्कूल मध्ये करण्यात आली सदर हायस्कूलमधील मुलींसाठी 1000 सॅनिटरी नॅपकिन्स आज च्या दिनी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेतील मुली यांना सुपूर्द करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी स्टार इंडियन दाईची लाईफ इन्शुरन्स शाखा कणकवली त्याच्या वतीने श्री मकरंद नाईक डेप्युटी एरिया मॅनेजर सिंधुदुर्ग, श्री संदेश सावंत टेरिटरी मॅनेजर कणकवली तसेच कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, त्यांचे सर्व संस्था चालक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दळवी, बँक ऑफ इंडियाचे स्टाफ असोसिएशनचे निखिल साटम, आणि स्टार युनियन दाईची लाइफ इन्शुरन्स कंपनीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!