खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण सेंट्रलच्या अध्यक्षपदी दयानंद कोकाटे यांची नियुक्ती

अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कीर्तीच्या रोटरी क्लबची खारेपाटण येथे स्थापना करण्यात आली. रोटरी क्लब मार्फत आरोग्य ,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लोकांच्या गरजेची अनेक भरीव कामे केली जातात.या क्लबची स्थापना करण्यासाठी खारेपाटण येथील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी एकत्र येऊन रोटरी क्लबची नुकतीच स्थापना केली . खारेपाटण हायस्कूल येथे पार पडलेल्या पहिल्या सभेमध्ये सर्व 22 रोटरियन उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष म्हणून श्री दयानंद कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच इतर कार्यकारणी पुढील प्रमाणे.
क्लब सचिव – Rtn. अजय जनार्दन गुरसाळे
क्लबचे उपाध्यक्ष – Rtn. मंगेश वसंत ब्रम्हादंडे
क्लबचे कार्यकारी सचिव – Rtn. संकेत प्रकाश शेट्ये
क्लब कोषाध्यक्ष – Rtn. सारिका सचिन महिंद्रे
सार्जंट ॲट आर्म्स – Rtn. यशवंत चंद्रकांत रायबागकर
क्लब फाउंडेशन चेअरमन – Rtn. रमाकांत आकाराम राऊत
क्लब सदस्यत्व अध्यक्ष – Rtn. आत्माराम देउ कांबळे
क्लब सार्वजनिक प्रतिमा अध्यक्ष – Rtn. योगेश सुरेश गोडवे
क्लब सेवा प्रकल्प अध्यक्ष – Rtn. सुबोध विजय देसाई
क्लब लर्निंग फेसिलिटेटर – Rtn. संतोष गंगाराम राऊत
क्लब यंग लीडर्स संपर्क – Rtn. संकेत प्रविण लोकरे.
रोटरी क्लब खारेपाटण परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करेल असा विश्वास नूतन अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!