गांजा सेवन करणे आले अंगलट, चौघांवर गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कणकवलीत हरकुळ बुद्रुक येथे कारवाई

कणकवलीतील गांजा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चार जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्या कडून गांजा, अंमली पदार्थ ओढण्यासाठीच्या दोन चिलीम, लायटर, मोबाईल व एक दुचाकी असा 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री, परराज्यातून जिल्ह्यात होणारी तस्करी रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर अंमली पदार्थ विरोधी कक्ष (Anti Narcotics Cell) स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच पोलीस ठाणेस्तरावरही कारवाईसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी दि. 5 मार्च ते दि. 5 एप्रिल 2025 रोजी या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. कारवाईसाठी नियुक्त केलेल्या पथकांना, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना गोपनिय माहिती घेवून अंमली पदार्थ सेवन, ताबा, वाहतूक, विक्री, साठवणूक बाबत दर्जेदार केसेस करण्याबात सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी येथे काही व्यक्ती गांजाचे सेवन करीत असल्याबाबत विश्वसनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक समोर भोसले, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र
शेळके यांचे नेतृत्वाखाली पथक कारवाईसाठी रवाना करण्यात आले या पथकाने हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी
येथे अकबर नूरमहमद पटेल रा. हरकुळ बुद्रुक- गावठणवाडी तुषार रावसाहेब करांडे, रा. कलमठ-बीडयेवाडी, प्रथमेश गणपत घाडीगांवकर, रा. मठबुद्रुक घाडीवाडी, ता. मालवण, आणि भुषण मंगेश लाड, रा. भवानी अपार्टमेंट, नाथ पै नगर, ता. कणकवली हे अंमली पदार्थांचे सेवन करीत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांचेविरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ 1985 कलम
8(क), 27 अन्वये कारवाई केलेली असून पोलीस हवालदार किरण देसाई यांचे फिर्यादीवरुन कणकवली पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या कडे गांजा, अंमली पदार्थ ओढण्यासाठीच्या दोन चिलीम, लायटर, मोबाईल व एक दुचाकी असा 90 जार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक, समीर भोसले, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस हवालदार डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे व किरण देसाई यांचे पथकाने केलेली आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपणास अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री वगैरेबाबत माहिती मिळाल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 02362-228614 किवा डायल 112 वर संपर्क करुन माहिती द्यावी. असे जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!