कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये दुकाने फोडली

पोलिसांच्या नाकावरती टिच्चून चोरटे पसार
सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान
कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे किराणा दुकानही चोरट्यानी लक्ष केले. बाजारपेठेतील दुकानांचे शटर वाकून चोरट्याने दुकानांमध्ये चोरी केली. भर बाजारपेठांमध्ये झालेल्या या चोरीने पोलिसांची मर्यादा उघड झाली आहे. बाजारपेठेत सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या झाल्यामुळे आता पोलीस तपास कसा होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर शनिवारी मात्र 9.30 वाजेपर्यंत एवढ्या चोऱ्या होऊन देखील पोलीस घटनास्थळी हजर झाले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज असताना देखील पोलिसांच्या धील्या कारभारामुळे या चोऱ्या झाल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान प्राथमिक माहिती मध्ये सात ते आठ दुकाने फोडली असल्याची माहिती समोर येत असून याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर व सीसीटीव्ही असून देखील चोरटे पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार झाले.