डॉक्टर्स फ्रँटर्निटी क्लब सिंधुदुर्ग, डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली, TVK ग्रुप, रांगणा रनर्स आणि रागिनी यांच्या सहयोगातून शिवपदमोहिमेचे आयोजन

शिवजयंती निम्मित खारेपाटण किल्ल्यावर साजरे होणार विविध उपक्रम
19फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिम्मित तथा शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी डॉक्टर्स फ्रँटर्निटी क्लब सिंधुदुर्ग, डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली, TVK ग्रुप, रांगणा रनर्स आणि रागिनी यांच्या सहयोगातून शिवपदमोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीची शिवपदमोहीम कणकवली ते किल्ले खारेपाटण अशी असून दि. 18फेब्रुवारी ला रात्री ठीक 9:30वाजता सुरु होऊन 19फेब्रुवारी ला पहाटे 5:30ते 6वाजे पर्यंत खारेपाटण किल्यावर दाखल होईल. त्या नंतर किल्ला दर्शन, दुर्गामाता दर्शन होईल, व या नंतर एक छोटेखानी कार्यक्रम होईल, यामध्ये किल्याबद्दल माहिती, इतिहास, पोवाडा, ऐतिहासिक देखावा असे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये सर्व शिवप्रेमिनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण