मुकुंद कदम यांचे निधन

देवगड येथील ज्येष्ठ व्यापारी मुकुंद शिवाजी कदम(वय८७)यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले. गढीताम्हाणे येथील मूळ रहिवासी असलेले मुकुंद कदम देवगड येथे व्यवसायानिमित्त स्थायीक झाले होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमठविला होता. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे.देवगड येथील पारकर सेंटरवरील कर्मचारी सुधाकर कदम यांचे ते वडील होत.तर देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांचे ते काका होत.