शिवगर्जना मित्रमंडळ नडगीवे आयोजित 19फेब्रुवारी ला शिवजन्मोत्सव सोहळ्या निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन

20फेब्रुवारी रोजी सायं. 6वा भव्य खुल्या नाईट कबड्डी स्पर्धाचे उदघाट्न
शिवगर्जना मित्रमंडळ नडगीवे यांच्या वतीने बुधवार दि. 19फेब्रुवारी 2025रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्या निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निम्मित शिवपुजन व शिवप्रेमींच्या भव्य दिव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9वाजता -दिपप्रज्वलन, शिवपूजन, सकाळी 10वा.-बाईक रॅली, दुपारी 11:30 वाजता -पणदूर येथील संविता वृद्धाश्रमास भेट व वृद्धाश्रमास आवश्यक गरजाची भेट देण्यात येणार आहे. तसेच दुपारी -4वाजता -हळदी -कुंकू, संध्याकाळी 5वा -खेळ पैठणीचा, संध्याकाळी 6वा -सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच 20फेब्रुवारी 2025 रोजी सायं. 6वा भव्य खुल्या नाईट कबड्डी स्पर्धा उदघाट्न करण्यात येणार आहे. या स्पर्धा नडगीवे स्टॅन्ड येथील जवळच्या मैदानात होणार आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क यश पाटील -9307596643
अभिषेक गुंडये -9172645414 यांना करावा असे आवाहन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या आयोजित विविध कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.