घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच – घनश्याम गांवकर

घाडीगांवकर समाज संस्था शतक महोत्सवी वर्ष सांगता समारोह संपन्न

ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एकरुप होऊन एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल, असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी घाडीगांवकर समाज भवनांचे विस्तृत सादरीकरण केले. त्यांनी पुढे असे संबोधन केले की,घाडीगांवकर समाज भवनांचा संकल्प सन १९९० ला त्यावेळच्या समाजधुरीनांनी केला. आपण हा संकल्प येत्या पाच वर्षात आपल्या सर्वाच्या साथीने पुर्ण करु. संस्था स्थापनेपासुन कार्यभार उचलेल्या कार्यकारी मंडळातील अध्यक्ष व सरचिटणिसांना मानप्रत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. याप्रसंगी मा. अशोक हांडे यांच्या हस्ते संस्थापक स्व. शंकरराव सोनु घाडीगांवकर यांच्या मानप्रत्राचे प्रतिकांत्मक अनावरण करण्यात आले.
सन १९२५ साली स्थापन झालेल्या क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या शतक महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रम नुकताच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई येथे अशोक हांडे निर्मित मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करुन करण्यात आला.
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेची वागदे , तालुका कणकवली येथे बहुउपयोगी घाडीगांवकर समाज भवन नियोजित आहे. या समाज भवन उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असुन त्यासाठी घाडीगांवकर समाजातील घटकांनी जास्तीत जास्त आर्थिक हातभार लावायला हवा,असे आवाहन संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. तसेच सर्व विभागांच्या वतिने संस्थेच्या डोंबिवली विभागांचे अध्यक्ष आर के घाडीगांवकर यांनी असे प्रतिपादन केले की,आम्ही सर्व विभाग आपापल्या विभागांतील समाजबांधवापर्यंत पोहचुन समाज भवन निधी संकलन करु.
शतक महोत्सवी सांगता कार्यक्रमात भाजपा मुंबई उपाध्यक्ष राजेश हाटले , शिवसेना उबाठाच्या उपनेत्या संजना घाडी , घाडीगांवकर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला मुंबईचे माजी नगरसेवक संजय घाडी , मध्यवर्ती कार्यकारिणीचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर , सरचिटणिस गजानन घाडीगांवकर , खजिनदार सुहास गांवकर, रश्मी घाडीगांवकर , समाज संस्थेच्या मध्यवर्ती व विभागीय पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकारीणीचे सर्व सदस्य,समाजातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने घाडीगांवकर बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत घाडी यांनी केले.

error: Content is protected !!