आनंदाचा कंद म्हणजेच गेट-टुगेदर

कणकवली कॉलेज कणकवली 1985 ची बी. कॉम्. बॅच गेली सतरा अठरा वर्षे अखंडित पणे मित्र-मैत्रिणी एकत्रित जमून वर्षातून एकदा गेट-टुगेदर सादर करतात. हे साधारणपणे दोन दिवस व एक रात्र अशा रीतीने आयोजित करण्यात येते. प्रत्येक मित्र-मैत्रिणी या गेट-टुगेदर मध्ये उत्साहाने सामील होऊन आनंदाचा कंद उपभोगत असतात. यावर्षीचे गेट-टुगेदर कुणकेश्वर मधील मिट मुंबरी येथील अस्मी रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते. या गेट-टुगेदर चे नियोजन व आयोजन वाडा पडेल येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार संदीप मालपेकर तसेच कणकवली व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजन पारकर यांनी अति उत्कृष्ट रित्या पार पाडले. याबाबत सामील झालेल्या मित्र-मैत्रिणींची प्रतिक्रिया घेतली असता, आनंदचा कंद म्हणजेच गेट-टुगेदर हे आवर्जून अभिमानाने सांगतात. या गेट-टुगेदर मध्ये साठीच्या वरील मित्रमैत्रिणी मनसोक्त आनंद उपभोक्ततात. गेट टुगेदर म्हणजेच आनंदाचे बारीक बारीक तुकडे करून कंद मनमुराद चाखत असतात. या सर्व आयोजनात प्रामुख्याने शासन सेवेतून निवृत्त झालेले राजपत्रित अधिकारी तसेच सध्या कार्यरत असणारे ॲडव्होकेट दीप रत्नाकर सावंत, रिटायर्ड पोलीस निरीक्षक दिलीप रासम इत्यादी सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने उत्तमरित्या गेट टुगेदर यशस्वी करतात.