भिरवंडेत रक्त तपासणी, रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने केले होते आयोजन

भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळाच्यावतीने बुधवारी गावातील रुग्णांची रक्त तपासणी आणि गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 70 रुग्णांची रक्त चाचणी (लिक्विड प्रोफाईल) करण्यात आली तर 10 दात्यांनी रक्तदान केले. सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईतील ऑर्थोपेडीक तज्ञ आणि गावचे सुपुत्र डॉ. श्रीकांत सावंत हे रुग्णांची आरोग्य तपासणी करणार आहेत.
सिंधुदुर्ग जि. प. आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवे-कनेडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भिरवंडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. या रक्त तपासणी आणि रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रक्त तपासणी शिबिरावेळी प्रा. आ. केंद्र कनेडीचे आरोग्य निरीक्षक राजेश बिडये, एनसीडी स्टाफ नर्स श्रुतिका कदम, भिरवंडे उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी संस्कृती देशमुख, आरोग्य सेविका शिला कांबळे, अक्षता सावंत, आरोग्य सेवक हरिश्चंद्र जाधव, उपजिल्हा रुग्णालयाच्या फार्मासिस्ट शितल पालव, कुडाळ रक्तनमुने वाहक अर्जुन जाधव, प्रयोगशाळा सहाय्यक साहिल गावडे, आशा स्वयंसेविका साक्षी सावंत, मिनल सावंत आदी उपस्थित होते. तर रक्तदान शिबिरावेळी सिंधुदुर्ग रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनू मासीरकर, अधिपारिचारिका प्रांजली परब, रक्तपेढी तंत्रज्ञ नेहा परब, रक्तपेढी सहायक कांचन परब यांच्यासह आरोग्यविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही दिवशी ग्रामस्थांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.

error: Content is protected !!