साकेडी माऊली स्पोर्ट आयोजित साकेडी प्रीमियर लीग स्पर्धेचे शानदार उद्घाटन

अनेक बक्षिसांची खैरात, दोन दिवस चालणार स्पर्धा

साकेडी प्रीमियर लीग चषकाचा मानकरी ठरणार उद्या

कणकवली तालुक्यातील साकेडी येथील माऊली स्पोर्ट मित्र मंडळ साकेडी तांबळवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साकेडी प्रीमियर लीग या वर ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गावचे सरपंच सुरेश उर्फ बंडू साटम यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून साकेडी मधील नवोदित खेळाडूंना एक व्यासपीठ मिळत असून, खेळाडूंनी अतिशय चांगल्या तऱ्हेने खेळ करत या स्पर्धेतून नावलौकिक मिळवा असे उद्गार सरपंच साटम यांनी काढले. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 10 हजार व चषक द्वितीय पारितोषिक 7 हजार व चषक त्याप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर, प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांना प्रत्येकी चषक देण्यात येणार आहेत.
साकेडी गाव मर्यादित असणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच सुरेश साटम, उपसरपंच प्रज्वल वरदम, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, तंटामुक्त अध्यक्ष राजू सदवडेकर, पोलीस पाटील शैलेश जाधव, सहकार भारती चे अनिकेत वालावलकर, रामचंद्र गुरव, विनोद जाधव, भास्कर वरदम, बबन वरदम, शामसुंदर वरदम, किरण वरदम, लक्ष्मण गुरव आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रज्वल वरदम यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत सुरक्षितपणे खेळ करा असे आवाहन केले. तर ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी दरवर्षी या स्पर्धा गावापासून दूर होत होत्या. मात्र यावेळी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात या स्पर्धा झाल्याने गावकऱ्यांना या स्पर्धांचा खऱ्या अर्थाने फायदा होणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी समालोचक, पंच आदींचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेकरता अतिशय देखणी असे नियोजन करण्यात आले असून, स्पर्धेत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून स्पर्धेला एक महत्त्व प्राप्त करण्यात आले आहे.

error: Content is protected !!