पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून अंध बांधवांना भविष्यात लागणारी सर्वतोपरी मदत करणार

वागदे सरपंच संदीप सावंत यांचे प्रतिपादन
गोपुरी आश्रम येथे अंध बांधवांच्या दोन दिवसीय विविध स्पर्धा
वागदे गोपुरी येथे लुई ब्रेन डे जयंती निमित्त 2 दिवसीय स्नेह संमेलन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी ग्रामसेवक युवराज बोराडे, सदस्य दीपक कदम
दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष बाबुराव गावडे
सचिव शेखर आळवे, नांदहरी सावंत
प्रकाश वाघ, शाम आजगावकर,
एकता दिव्यांग संघाचे _सुनील सावंत, संजय वारंगे, सचिन सादेय, दीपक बोभाटे, विनय ओटवकर,दीपक दळवी,
आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच संदीप सावंत यांनी मनोगत व्यक्त करून दृष्टीहीन संघ व उपस्थिताना शुभेच्छा दिल्या.
भविष्यात आपणास जिल्ह्यातील लागणारी मदत पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू असेही सरपंच संदीप सावंत यांनी सांगितलं
उपस्थित सर्व अंध बांधवांनी सरपंच यांचे आभार व्यक्त करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.