असलदेत बुवा प्रविण सुतार विरुध्द शुभम पाळेकर यांचा डबलबारीचा सामना

गणेश जयंतीनिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे आयोजन
श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ, असलदे उगवतीवाडी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे माघी गणेश जयंती २०२५ निमित्त श्री गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायणाची महापुजेचे शनिवार दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्त सकाळी ९.३० ते १० वाजता श्री गणेश पूजन , सकाळी १०.३० श्री सत्यनारायणाची महापुजा , सकाळी ११.३० वाजता महाआरती ,दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद , दुपारी ३ ते ५ वाजता हळदीकुंकु समारंभ, सायं. ५ ते ७ वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम , 7 ते 8वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्री 8वाजता रात्री 10वाजता स्थानिक भजने , रात्रौ १० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, पुरळ (देवगड) गुरुवर्य : बुवा अजित मुळम यांचे शिष्य बुवा प्रविण गोपाळ सुतार ,पखवाज – रितेश पांचाळ, तबला-सुदर्शन मेस्त्री विरुध्द श्री मालवीर भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, पाळेकरवाडी, ता. देवगड), गुरुवर्य – बुवा विजय परब व बुवा गुणाजी पाळेकर यांचे शिष्य बुवा – शुभम पाळेकर पखवाज – सर्वेश पाळेकर तबला – संकेत गोसावी यांच्यात होणार आहे, तरी या निमित्ताने आयोजित धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे.