गोव्यातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा कु.सुश्रुत मंदार नानल चमकला.

कणकवली/मयूर ठाकूर.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या स्मरणार्थ गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर ओपन रेटिंग चेस टूर्नामेंट मध्ये सहभाग घेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या कु.सुश्रुत मंदार नानल याने 34 वा क्रमांक प्राप्त करून आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.यासोबतच त्याचे फिडे रेटिंग 1590 एवढे झाले आहे. या स्पर्धेत जगभरातील 21 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.