ओटव चे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांना मातृशोक

कणकवली तालुक्यातील ओटव येथील रहिवासी सुनंदा रामचंद्र परुळेकर (97) यांचे आज गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या पश्चात तीन मुलगे, नातवंडे, सुना, मुली,असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षिका अश्विनी परुळेकर यांच्या त्या सासु तर ओटव चे माजी सरपंच व कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवलीचे माजी अध्यक्ष हेमंत परुळेकर यांच्या त्या आई होत.