त्रिंबक बगाडवाडी येथे भरदिवसा सकाळी घरफोडीमागिल दरवाजा फोडून कपाटातील रक्कम बनावट दागिने चोरले

आचरा कणकवली रस्त्यावर त्रिंबक बगाडवाडी येथे राहणारे केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड सर यांच्या घरात भर दिवसा गुरुवारी सकाळी घराचा मागिल दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून कपाटातील वेगवेगळ्या भागात ठेवलेली अंदाजे पंचवीस हजार रुपये रक्कम आणि कपाटातील बनावट दागिने चोरण्याची घटना उघड झाली आहे.घटनास्थळी आचरापोलीस दाखल झाले होते.
गुरुवारी सकाळी साडे आठ च्या दरम्यान सौ रुचिरा गाड या बैठकीला तर पावणे नऊ च्या सुमारास राजेंद्र प्रसाद गाड सर शाळेत गेल्याचा फायदा उठवित चोरट्यांनी घराचा मागिल दरवाजा फोडून घरातील ऐवजावर डल्ला मारल्याचे दिसून येत होते.बैठकिवरुन सकाळी अकराच्या सुमारास घरीआलेल्या रुचिरा गाड यांच्या हि घटना नजरेस आली.
.त्यांना घराचा मागिल दरवाजा सताड उघडा ठेवून,घरातील दोन्ही कपाटेफोडून सर्व सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे दिसून आले
याबाबत पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांनी आचरा पोलीस स्टेशनला खबर देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, उप निरीक्षक चोरगे,पोलीस कर्मचारी मनोज चव्हाण, महिला पोलीस कर्मचारी तांबे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.त्रिबक सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे,ग्रामसेविका माधुरी कामतेकर, तलाठी शेजवळ, पोलीस पाटील सिताराम सकपाळ,सारंगी चव्हाण,गणेश गोसावी, सिमा घाडीगांवकर,आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांसह ग्रामस्थ उपस्थित झाले होते.पोलीस पाटील व ग्रामस्थांनी घराच्या आजूबाजूचा परीसरात शोध घेतला होता पण चोरटे आढळून आले नाहीत.चोरटे दगडी कंपाऊंड वरुन उडी मारुन आल्याचा घराच्या पॅसेजमध्ये लागलेल्या ओल्या मातीवरुन अंदाज व्यक्त केला जात होता.यात महिला आणि पुरुष चपल्लांचे ठसे असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात होते.
भर दिवसा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आचरा परीसरात मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

error: Content is protected !!