कणकवली एस एम हायस्कूलच्या 1987 च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा अनोख्या उपक्रमाने साजरा

डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यामार्फत बॅचच्या सदस्यांची मोफत रक्त तपासणी
स्नेह मेळावा करून आनंद साजरा करताना आरोग्याची काळजी घेण्याचा या उपक्रमातून संदेश
1987 मधील दहावीच्या कणकवली एस एम हायस्कूल मधील बॅच च्यां स्नेह मेळाव्यां निमित्ताने एक वेगळी संकल्पना राबवत या स्नेह मेळावा मधून एक वेगळा संदेश देण्यात आला. स्नेह मेळाव्याची ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी या बॅचच्या अनेकांनी पुढाकार घेतला व त्यातून या स्नेह मेळावा च्या निमित्ताने या बॅचमधील अनेक सदस्यांनी आरोग्य तपासणी राबविण्याची संकल्पना समोर आणली. याला सत्यात उतरवण्याचे काम केले ते कणकवलीतील प्रतिथयश डॉ. विद्याधर तायशेटे यांनी. डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या माध्यमातून या बॅचमधील सर्व सदस्यांची मोफत रक्त तपासणी करत या सर्वांना स्नेह मेळाव्यां निमित्ताने एक आपल्या आरोग्याच्या काळजी घेण्याचा संदेश देखील देण्यात आला. जेणेकरून धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. व त्यातून अनेक आजार उद्भवतात. म्हणूनच हा उपक्रम राबवत या बॅच ने एक अनोखा संदेश सर्वांसमोर ठेवला आहे. या मोफत रक्त तपासणी शिबिरा वेळी विलास परब, दयानंद उबाळे, गुरुनाथ कुलकर्णी, शिवराम हिर्लेकर, अरुण जोगळे, महेश चव्हाण, प्रमोद चव्हाण, सुनील तेली, मनोज तोरस्कर, हसमुख पटेल, जयेंद्र निग्रे, राजेश सापळे, डॉ. अभिजीत आपटे, संगीता प्रभू, राजेंद्र राणे आदी उपस्थित होते.