कणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना गेले अनेक दिवस बंद

कोकण रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास
जिना दुरुस्तीचे काम करायला कोकण रेल्वेला अजून किती महिने लागणार?
गेले काही दिवस कणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना बंद स्थितीत असताना देखील याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे याचा त्रास रेल्वे प्रवाशांना होत आहे. वयोवृद्ध प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाताना पायऱ्या चढून जावे लागत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली रेल्वे स्टेशनवर असलेला सरकता जिना हा शोभेचा बनला आहे. गेले काही दिवस हा जिना बंद असताना याबाबत कोकण रेल्वे प्रशासन सुशेगात असल्याने रेल्वे प्रवशा मधून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता तांत्रिक दोष असे सांगितले जाते. मात्र गेले अनेक दिवस तांत्रिक दोष कोकण रेल्वे ला दूर करता येत नसेल तर आता याला उपाय काय? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.