“माकड पकड मोहीम” राबविण्याबाबत वनविभागाने कार्यवाही करा

हरकुळ बुद्रुक येथील राजू पेडणेकर यांच्यासह ग्रामस्थांची मागणी

गेली अनेक वर्षे हरकुळ बुद्रुक गावामध्ये वस्तीत घुसून माकड त्रास देत आहेत, नारळ, सुपारी,फणस,केळी,काकडी, भाजीच्या फळांचे वेलं,तसेच फळ झाडें असणाऱ्या लोकांचे या माकडानी खूप नुकसान केले आहे,खाऊन आणि नासधूस करून खूप नुकसान करत आहेत.उन्हाळी शेती करणेही या माकडानमुळे त्रासाचे होत आहे त्यामुळे गावातील उन्हाळी शेती, भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यानी शेती करणे बंद केली आहे.
या नुकसानीचा बंदोबस्त करण्यासाठी सन्माननीय श्री. राजू पेडणेकर आणित्यांचे सहकारी श्री. निलेश तेली, श्री. चंद्रकांत परब, श्री. इमरान शेख, श्री. मामा माणगांवकर, श्री. सापळे यांनी मान.वनविभाग अधिकारी कणकवली यांच्याकडे आज निवेदन दिले आहे.जेणेकरून मोहीम राबवून
लोकांचे होणारे नुकसान व मनस्ताप थांबवता येईल. अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली राजेंद्र घुणकीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!