शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे दिनांक 29 डिसेंबर 2024ला माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील सर्व माजी विद्यार्थ्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले आहे. सदर मेळाव्याला सर्व आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . संपूर्ण दिवसभर माजी विद्यार्थ्यांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे ,उपाध्यक्ष श्री भाऊ राणे ,सचिव श्री महेश कोळसुलकर ,सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे प्राचार्य श्री संजय सानप ,पर्यवेक्षक श्री संतोष राऊत व सर्व शिक्षक यांनी केले आहे.

error: Content is protected !!