विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कारानी रसिक झाले मंत्रमुग्ध.
कणकवली/मयूर ठाकूर.
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन (आयडियल उत्सव 2024) नुकतीच संपन्न झाले. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करुन उद्घाटन संपन्न झाले. यानंतर गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली .LKG ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे एकापेक्षा एक नृत्याविष्कार सादर झाले. चिमुकल्यांच्या नृत्या पासून लावणी, तेलगू ,राजस्थानी, गुजराती, बॉलिवूड हिंदी सॉंग फ्युजन, क्रिसमस ,फिनाले डान्स अशी रंगतदार नृत्य सादर झाली.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पालक उत्सव स्पर्धेतील प्रथम क्रमांक पालकांना गौरवण्यात आले. यामध्ये सोलो डान्स स्पर्धेत सौ.दीपा दिलीप सरूडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सोलो साँग स्पर्धेत श्री.सिद्धेश खटावकर सर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सौ.ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर तोरसकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच आर्ट गॅलरी प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. KG विभाग मध्ये कु.अंकिता यादव ,1 ली 4 थी मध्ये कु.अरोही दळवी 5 वी ते 10 वी मध्ये कु.शिशु जिना, 11 वी ते 12 वी मध्ये कु.सारा खान यांनी बेस्ट स्टूडेंट अवॉर्ड प्राप्त केला.त्याचप्रमाणे ओलंपियाड, तायक्वांदो, चेस, योगा, मल्लखांब, या खेळांमध्ये जिल्हा विभाग व राज्यस्तरावर विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. मार्शल आर्ट कॅडेट फोर्सच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना रोप मल्लखांब, मल्लखांब पिरॅमिड ,लाठीकाठी,अशी प्रात्यक्षिके सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून कणकवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मारुती जगताप साहेब उपस्थित होते, त्याचप्रमाणे व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल ,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर सर,सल्लागार श्री. डी .पी.तानावडे सर,सन्माननीय श्री. यज्ञेश शिर्के सर,सौ. गौसिया बुलंद पटेल मॅडम,सौ. सुरेखा हरिभाऊ भिसे मॅडम आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. 2024 च्या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व पालक तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थी व प्रशाला शिक्षक श्री.हेमंत पाटकर सर व सौ. शितल बांदल मॅडम यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.