नडगिवे धुरिभाटले वाडी येथे दि.१४ ते १७ डिसेंबर २०२४ रोजी

महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोस्तवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नडगिवे,धुरी भाटले वाडी ता.कणकवली येथे श्री देव महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ (रजि.) नडगिवे धुरी भाटले वाडी या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.१४ ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक व शैशणिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री विलास करगुटकर व सचिव प्रवीण मोरये यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
शनिवार दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती उस्तवाने या कार्यक्रमाची सुरावात होणार असून या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.तर दि.१५ डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे उद्घघाटन व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला आहे. तसेच निनादेवी महिला ढोल पथक राजापूर यांचे समधुर ढोल वादन महापुरूष पटांगण येथे होणार आहे.तर गावातील वाडीवार वारकरी भजने महापुरुष पार येथे होणार आहेत.
सोमवार दि.१६ रोजी नडगिवे जि.प.शाळा क्र.१ ला बेंच प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. तसेच मंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.तर सायं. ५.०० वा. जिल्हास्तरीय ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तर मंगळवार दी.१७ रोजी सकाळी अभिषेक सत्य नारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तर दु.३.०० वा.महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.साय.६.०० वा.महापुरूष पटांगण येथे भव्य दिंडीचे व मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.तर रात्री १०.०० वाजता आओ साई निर्मित व राजू पाटील दिग्दर्शित ‘ सुर साईचे ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
तरी नडगिवे धूर भाटले वाडी येथील श्री देव महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळाच्या या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाच्या वतीने श्री रमाकांत चव्हाण यांनी केले आहे.