मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग प्रकरणी कणकवलीत 20 हजारांचा दंड
वाहतूक पोलीस राजेश पाटील विनोद चव्हाण यांची कारवाई
रस्त्यावरती धोकादायक रित्या वाहन लावणे यासह मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत तब्बल 20 हजारांचा दंड करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी कणकवली शहरात ही कारवाई केली. या कारवाईमध्ये वाहतूक पोलीस राजेश पाटील व हवालदार विनोद चव्हाण यांनी सहभाग घेतला होता. रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन लावणे प्रकरणात तीन केस करण्यात आल्या. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार ट्रिपल सीट ,मोबाईल संभाषण, नंबर प्लेट नसणे, वाहतुकीस अडथळा करणे या कारना खाली ही कारवाई करण्यात आली.