प. पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळ, रत्नागिरी आणि स्वराभिषेक रत्नागिरी, आयोजित गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धा संपन्न
शेठ न.म. विद्यालय खारेपाटण ची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिचा द्वितीय क्रमांक
प. पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळ, रत्नागिरी आणि स्वराभिषेक रत्नागिरी, आयोजित गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धेमध्ये
सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातून अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेचे परीक्षण मान्यवर परीक्षक श्री. गुरुराज गावकर सर (गोवा) व श्री. विराज गावस सर (गोवा) यांनी केले.
या स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री. विजय रानडे, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीम. संध्या सुर्वे, गायिका सौ.परब मॅडम व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये प्राजक्ताने मी पुन्हा वनांतरी हे बहारदार नाट्यगीत सादर करून प्रेक्षकांची व परीक्षकांची वाहवा मिळवली.
प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार श्री. संदिप पेंडूरकर यांचे मार्गदर्शन प्राजक्ताला लाभले…
या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री.संजय सानप सर. पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे प्राजक्ता व तिचे पालक यांचे अभिनंदन करण्यात आले .