अल्पवयीन युवतीचा विनयभंग : एकास अटक

उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांच्याकडून घटनेचा तपास सुरू
तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन कॉलेज युवतीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरुन एका ३० वर्षीय तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याला मंगळवारी कणकवली न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. ही घटना गेल्या 2 महिन्यादरम्यान घडली. पिडीत युवती आणि त्या तरुणाची ओळख होती. ती कॉलेजमधून घरी येत असताना संशयित तरुणाने तिचा विनयभंग केला असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास कणकवलीच्या महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहे.
कणकवली प्रतिनिधी