कवी सफरअली इसफ यांना वसंत- कमल काव्य पुरस्कार जाहीर

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांची माहिती

5 जानेवारी रोजी इचलकरंजी येथे कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते गौरव

   इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या वसंत-कमल स्मृती काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सदर पुरस्कार कोकणातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ (वैभववाडी तिथवली) यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बहुचर्चित 'अल्लाह ईश्वर ' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.

सदर पुरस्काराची निवड नामवंत समीक्षक समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे, आणि लेखक -समीक्षक प्रा.डॉ रमेश साळुंखे यांच्या परीक्षण समितीने केली असून ५ जानेवारी रोजी इचलकरंजी येथे होणाऱ्या साहित्य संस्कृती संमेलनात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकर कृष्णात खोत यांच्या हस्ते सदर पुरस्कार देऊन कवी सफरअली यांना गौरविण्यात येणार आहे. ‘अल्लाह ईश्वर ‘ मधील कविता आजच्या जातीय धार्मिक ध्रुवीकरणाकडे निर्देश करताना माणूस कसा विभागला गेला आहे याचचे भेदक वास्तव सांगते. माणसाचा माणसावरचा विश्वास उडून जावा इतका माणूस अधिक वर्चस्ववादी झाला आहे. या वर्चस्ववादी वृत्तीचा बळी अल्पसंख्यांक गट ठरत असून या सगळ्याची चिकित्सक मांडणी करताना या कवितेत कुणाबद्दलही कटुता नाही हे या कवितेचे सर्वात महत्वाचे मोल आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘अल्लाह ईश्वर’ काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे.

error: Content is protected !!