आचरा गावपळणीच्या पार्श्वभूमीवर आचरा व्यापारी संघटनेने घेतली पोलीस निरीक्षक पोवार यांची भेट
गावपळण सुरक्षेबाबत पोलीस बंदोबस्त वाढविण्याची केली मागणी
आचरा गावपळणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी आचरा व्यापारी संघटने तर्फे आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांची भेट घेऊन गावपळणीत आचरा बाजारपेठ सुरक्षेबाबत निवेदन देत चर्चा करण्यात आली. यावेळी गावपळण कालावधीत आचरा तिठ्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यासोबत बाजारपेठेत तसेच संपूर्ण आचरा गावात पोलीस गस्त आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच आचरा बाजारपेठ येथील ज्वेलर्स च्या दुकानात झालेल्या चोरीच्या तपासा बाबत चर्चा करण्यात आली यावेळी व्यापारी संघटनेचे वामन आचरेकर, राजन पांगे,अर्जुन बापर्डेकर, मंदार सांबारी,उदय घाडी,माणिक राणे,सिद्धांत हजारे ,तसेच बाबू हडकर,दुर्गाप्रसाद तुळपुळे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक पोवार यांनी गावपळण कालावधीत सुरक्षेबाबत योग्यती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले