व्यावसायिक जबाबदारी व सहकार्य म्हणूनच “त्या” आरोपींचे तात्पुरते वकीलपत्र!

गुरांच्या अवैध वाहतुकीबाबत गुन्ह्यातील वकीलपत्रा बाबत ॲड. राजेश परुळेकर यांची माहिती

आमदार नितेश राणे यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांचे षडयंत्र

खारेपाटण येथे कारवाई करण्यात आलेल्या गुरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी ॲड. विलास परब कणकवली हे नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. त्यांनी मला विनंती केली त्यानुसार या गुन्ह्यात त्यांच्या वतीने वकील म्हणून त्यांना सहकार्य व व्यावसायिक जबाबदारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात काम पाहिले होते. विलास परब यांनी मला सांगितलेल्या माहितीनुसार खारेपाटण येते गुरांचा ट्रक पकडलेला आहे त्यातील आरोपीने मला कळविलेले असल्यामुळे आजचा दिवस आपण कोर्टात हजर राहून माझ्या वतीने काम पहावे असे सांगितल्याने या प्रकरणात मी तात्पुरत्या स्वरूपात वकीलपत्र दिले होते. मी एक दिवसा करिता सदर केस मध्ये हजर राहून ॲड.विलास परब यांचे वतीने बाजू मांडली. केवळ ॲड. परब याना सहकार्य म्हणुन मी त्यांना मदत केली होती. तसेच आपण सदर कथित घटनेतील आरोपींचा व माझ्या पक्षाचा म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा व आमदार नितेश राणे यांचा काही संबंध नाही. आमदार नितेश राणे यांना बदनाम करण्याच्या हेतूने व त्यांना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने विरोधकांची कुरघोडी आहे. अशी माहिती भाजपा वकील सेल चे जिल्हा संयोजक ॲड. राजेश परुळेकर यांनी दिली आहे.

error: Content is protected !!