भजनमहर्षी बुवा चिंतामणी पांचाळ यांच्या स्मारकास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसकडून 50,000 रुपयांची रोख देणगी.

18 जानेवारी 2025 रोजी बुवांच्या पुण्यतिथी निमित्त होणार स्मारकाचे अनावरण.

धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय मंडळींनी सढळ हस्ते देणगी देऊन सहकार्य करण्याचे स्मारक समितीचे आवाहन.

कणकवली/मयूर ठाकूर.

कुडाळ भरणी गावचे सुपुत्र असलेले भजनमहर्षी चिंतामणी पांचाळ बुवा यांच्या स्मारक उभारणीचे कार्य गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.या स्मारकाचे अनावरण बुवांच्या पुण्यतिथी निमित्त 18 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.चिंतामणी पांचाळ बुवांचे भजन क्षेत्रातील कार्य सर्वश्रुत आहे.त्यांची आठवण भजनी बुवांच्या मनी कायम आहेच पण तरीदेखील भजन क्षेत्रातील या थोर रत्नाचे स्मारक निर्माण व्हावे अशी भावना सर्वच भजनी बुवांप्रती आहे.याच धर्तीवर स्मारकाच्या बांधकामाचा शुभारंभ मागील वर्षी दत्तजयंतीच्या मंगल दिनी झाला.हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी भजन क्षेत्रातील भजन मंडळी,तसेच सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीय व्यक्तींनी सढळ हस्ते देणगी स्वरूपात मदत करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.असे आवाहन देखील कै.चिंतामणी पांचाळ बुवा स्मारक समितीने केलेले आहे.
याच पार्श्वभूमीवर धार्मिक क्षेत्रात भजन आणि वारकरी सांप्रदायाला तसेच दशावतार लोककलेला वेळोवेळी सहकार्य करणारे भजनी बुवा तसेच भजनप्रेमी आणि भजन क्षेत्राचा गाढा अभ्यास असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांनी या स्मारक उभारणी कार्यास 50 हजार रुपयांची रोख मदत करून सहकार्य केले.या त्यांच्या सहकार्याबद्दल स्मारक समिती तसेच चिंतामणी पांचाळ बुवांचे सर्व शिष्यगण यांनी आभार व्यक्त केले.या क्षणी चिंतामणी पांचाळ बुवा यांचे वारसदार बुवा योगेश पांचाळ,ज्येष्ठ भजनी बुवा गोपी लाड,स्मारक समिती अध्यक्ष बुवा निलेश ठाकूर तसेच बुवा तथा पत्रकार मयूर ठाकूर उपस्थित होते.

या स्मारक उभारणी कार्यास आपलेही योगदान देण्यासाठी.
SINDHUDURG BANK
शाखा – घोडगे
अकाउंट नंबर- 017400000011222
IFSC CODE- SIDE 0001017

error: Content is protected !!