आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर तसेच सल्लागार डी.पी तानावडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम,स्पर्धेच्या परीक्षक सौ.रश्मी माणगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
ज्युनिअर केजी व सीनियर केजी च्या चिमुकल्यांसाठी आयोजित या स्पर्धेत चिमुकल्यांनी फुलपाखरू ,जिराफ ,शिवरायांचा मावळा, कोळी, अशा विविध वेशभूषा करून रसिकांची मने जिंकली या स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक – विघ्नराजाय सावंत
द्वितीय क्रमांक – ऋता वालावलकर
तृतीय क्रमांक – अर्णव जाधव
उत्तेजनार्थ प्रथम – राहूल घाडीगांवकर.
उत्तेजनार्थ द्वितीय – दिशा गोठणकर
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.बांदल मॅडम यांनी केले.

error: Content is protected !!