विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत भारताचां संविधान दिन चित्ररूपाने साजरा

संविधान उद्देशिकेचे केले वाचन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत भारताचे संविधान दिन उत्साहात साजरा केला . संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम संविधानाची उद्देशिका वाचन करून संविधानाचा आदर केला . प्रशालेच्या चित्रकला विभागाने संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानावर आधारित चित्रकला स्पर्धा प्रशालेत कला विभागप्रमुख प्रसाद राणे सर यांनी आयोजित करून भारताच्या संविधानाचे विविध पैलू चित्ररूपाने साकार केले इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका वृषाली जाधव यांनी स्पर्धेचे उद्गाटन करून मार्गदर्शन केले संविधान दिनासाठी प्रशालेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.