कणकवली येथे २९ पासून त्रिसूत्री संगीत महोत्सव!

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन
कणकवली: येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतीक प्रतिष्ठान तर्फे कणकवली येथे संस्थेच्या नाट्यगृहात २९नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत त्रिसूत्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या त्रिसूत्री संगीत महोत्सवा अंतर्गत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा होणार आहे.
सकाळी ९.३० उद्घाटन सोहळा होईल.
सायंकाळी ७ ते ७:३० शास्त्रोक्त गायन प्रथम विजेता (वामन दाजी शास्त्रीय गायन स्पर्धा २०२४) त्यानंतर
७:३० ते ८ शास्त्रोक्त गायन श्रुती सावंत (पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राची विद्यार्थिनी),रात्री ८ ते ९ सारंगी वादन संगीत मिश्रा (मुंबई)हे करणार आहेत.
त्यांना तबला साथ चारूदत्त फडके (पुणे)करणार आहेत.
रात्री ९ ते १० भरतनाट्यम् नृत्य-प्रिया जोशी (पुणे)या सादर करणार आहेत.
३० नोव्हेंबर रोजी रसग्रहण कार्यशाळा होणार आहे. सकाळी १० ते ५:३०या कालावधीत पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या ख्यालाच्या बंदीशी याविषयी
पं. सुधाकर देवळे, पं. वसंत मराठे, व पं. शौनक अभिषेकी हे मार्गदर्शन करणार आहेत.
रात्री ७ते ८ या कालावधीत
शास्त्रोक्त गायन पं.सुधाकर देवळे, उज्जैन (पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य),
रात्री ८ ते ८:३० या कालावधीत शैला मुकुंद लिखित ग्रंथ ‘अभिषेकी… कला व जीवनप्रवास’ चा पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्यवृंदांच्या हस्ते प्रकाशन सोहळा होईल.
रात्री ८:३० ते १० शास्रोक्त गायन-पं. शौनक अभिषेकी करतील.त्यांना
संवादिनी साथ चिन्मय कोल्हटकर (गोवा) व तबला साथ चारुदत्त फडके (पुणे)हे करतील.
१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १:३० या कालावधीत रसग्रहण कार्यशाळा होईल. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी स्मृति संगीत महोत्सवाला प्रारंभ होईल. त्याअंतर्गत सायंकाळी ७ ते ८:३० तबला एकल वादन पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर हे करतील.त्यांना
साथसंगत तबला सावनी तळवलकर, संवादिनी चिन्मय कोल्हटकर करतील. तर गायन पं. डॉ. समीर दुबळे हे करतील.
रात्री ९:०० ते १०:३० शास्त्रोक्त गायन
पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांचे होईल. त्यांना तबला साथ पं. सुरेश तळवलकर व संवादिनी साथ चिन्मय कोल्हटकर (गोवा) हे करतील.या संगीत सोहळ्याचा लाभ रसिकांनी घ्यावा,असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड.एन. आर.देसाई यांनी केले आहे.