कलमठ ग्रामपंचायत वतीने संविधान दिन साजरा

संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

भारतीय ७५ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने कलमठ गावातील संविधान स्तूपला पुष्पहार अर्पण करून संविधान वाचन करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने 75 व्या संविधान दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये शालेय चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, समीर प्रभूगावकर, बाबू नारकर, खुशाल कोरगावकर, गणेश सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!