कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितेश राणे यांचा जिल्हा परिषद मतदार संघ निहाय प्रचार

आमदार नितेश राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन

महायुतीचे कणकवली मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांचा प्रचार करण्यासाठी कणकवली राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य विलास गावकर् कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे राष्ट्रवादी खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे,राजेंद्र पिसे भाई डबे यानी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन जिल्हा परिषद मतदार संघ निहाय प्रचार करत आहेत. खारेपाटण,कळसुली,
बिडवाडी,फोंडा,जानवली व इतर मतदार संघात आमदार नितेश राणे यांच्या विजयासाठी घरोघरी प्रचार करताना नितेश राणे यानी केलेली विकासकामे सांगत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. व प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!