लोरे नंबर 2 नेमणवाडी येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे केले स्वागत

लोरे नं. 2 नेमनवाडी येथील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केल.
 प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रकाश दरडे, रामचंद्र कुडतरकर, सिताराम मांजलकर, रमेश दरडे, संदेश दरडे, सुहास तरडे, दीपक दरडे, रोहित दरडे, दीपक नेमन, लक्ष्मी दरडे, सरस्वती दरडे, सुनंदा आग्रे, तारामती दरडे व असंख्य कार्यकर्त्याचा समावेश आहे.

पक्ष प्रवेश कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पार पडला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भरत मांजलकर, प्रकाश गव्हाणकर, गोट्या पांचाळ, मंदार रावराणे, छोटू रावराणे, तेजस रावराणे, अमोल गोरुले, अभिषेक मांडवकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!