कणकवली तालुक्यात तोंडवली मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले ठाकरे गटात स्वागत
कणकवली तालुक्यामध्ये बबन नारकर यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द हुलेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तोंडवली येथे प्रवेश केला. सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या संदेश पारकर यांना 100 टक्के मतदान करण्याचा निर्णय तोंडवली येथील जनतेने केला. प्रवेश करणाऱ्या नागरिकांमध्ये उमेश हुले,सुनील हुले, अश्विन हुले, ओंकार हुले, रावजी हुले, शुभम हुले, अमित कोलते, सुनील भिसे आदींनी केला प्रवेश. यावेळी त्याच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रवीण कुडतरकर, प्रवीण गुरव, समीर तेली ,संजय बंदरकर, सिद्धेश राणे, तात्या निकम, आबु मेस्त्री आणि तोंडवली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.