कणकवलीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का

उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपामध्ये प्रवेश

कणकवली शहर बुध २८९ गांगोवाडी व टेंबवाडी मधील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू रूपेश उर्फ ( चाणी ) जाधव व त्यांच्यासोबत
राहुल वालावलकर, रोशन जाधव आदींनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी
माझी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, अभय राणे, अण्णा कोदे , विराज भोसले, बुध अध्यक्ष परेश परब, युवा मोर्चा शहरअध्यक्ष सागर राणे आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!