पोईप मध्ये श्री देव वेताळ मुंजेंश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून ” वैभवचो संभाळ करून तेका मोठ्या मताधिक्यान निवडून हान रे महाराजा “

मालवण तालुक्यातील पोईप येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी10.00वाजता पोईपचे ग्रामदैवत श्री देव वेताळ मुंजेंश्वर मंदिरात पोईप शिवसेनिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून झाला श्री देव वेताळ मुंजेश्वर चरणी “बा देवा महादेवा महाराजा; वैभवचो संभाळ करून तेका मोठ्या मताधिक्यान निवडून हान रे महाराजा “असं साकडे घालण्यात आले
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी “वैभव नाही आगे बढो ;हम तुम्हारे साथ है “निष्ठेचे पाईक वैभव नाईक अशा घोषणा देत प्रचाराचा शुभारंभ केला
याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांना विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असा समस्त पोईप येथील शिवसैनिकांनी निर्धार केला
यावेळी पोईपचे सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पालव , परशुराम नाईक दत्ताराम पालव, विभाग प्रमुख विजय पालव ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम ,माजी सरपंच बाबली पालव , पोईप संस्थेचे चेअरमन विठ्ठल नाईक ,राजेंद्र पालव ,विलास सांडव , शाखाप्रमुख अनिल येरम ,सुशील पालव, बाळा सांडव , भिवा पारकर, दीपक नाईक,राजा पोईपकर ,महेश चव्हाण ,बिरबल पालव ,पांडुरंग चव्हाण ,अरुण माधव ,सौ पालव व पोईप गावातील निष्ठावंत बहुसंख्या शिवसैनिक उपस्थित होते





